MahaBhulekh Mahabhumi – 7/12 (Satbara Utara) 2024

महाराष्ट्र शासनाने आता जमिनीचे अभिलेख ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत, ज्यामुळे नागरिकांना कार्यालयात जाण्याची गरज नाही. महा भुलेख महाभूमी पोर्टल द्वारे तुम्ही 7/12 (mahabhulekh 7 12), 8A, मालमत्ता पत्रक आणि इतर जमिनीचे रेकॉर्ड सहजपणे मिळवू शकता.

हा लेख तुम्हाला महाभूलेख पोर्टलवरील सर्व सेवा आणि त्यांचा वापर कसा करावा याची सविस्तर माहिती देईल.

Land Records Available on Mahabhulekh

महा भुलेख महाभूमी पोर्टल हे अनेक प्रकारच्या जमिनीच्या अभिलेखांसाठी उपयुक्त आहे. यामध्ये खालील सेवा उपलब्ध आहेत:

  • विना स्वाक्षरीतील 7/12 उतारा, 8A आणि मालमत्ता पत्रक.
  • डिजिटल स्वाक्षरी असलेले 7/12, 8A, आणि मालमत्ता पत्रक.
  • जमिनीचे नकाशे.
  • फेरफार माहिती
  • जुन्या आणि नवीन फेरफाराच्या नोटीस आणि स्थिती तपासा.
  • जुन्या जमिनीचे रेकॉर्ड मिळवणे.

महा भुलेख पोर्टलद्वारे 7/12 उतारा कसा पहावा

  • bhulekh.mahabhumi.gov.in या अधिकृत पोर्टलवर भेट द्या.
  • पोर्टलवर आल्यावर तुमच्या विभागाचा (उदा. अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे) पर्याय निवडा आणि ‘Go’ बटणावर क्लिक करा.
Mahabhulekh Portal
  • त्यानंतर तुम्हाला 7/12 पाहण्यासाठी तुमच्या जिल्हा, तालुका आणि गाव निवडावे लागेल.
  • संबंधित जमिनीची माहिती शोधण्यासाठी सर्वे नंबर, गट क्रमांक किंवा मालकाचे पूर्ण नाव भरून ‘शोधा’ बटणावर क्लिक करा.
Maha Bhulekh 712
  • शेवटी, तुमचा मोबाइल क्रमांक द्या आणि ‘7/12 पहा’ बटणावर क्लिक करा.
  • कॅप्चा कोड भरा आणि ‘Verify Captcha to View 7/12’ बटणावर क्लिक करा.
  • तुमच्या स्क्रीनवर सातबारा उतारा दिसेल, ज्यामध्ये ULPIN क्रमांक, मालकांचे नाव, क्षेत्रफळ आणि इतर महत्त्वाची माहिती मिळेल.
land record mahabhulekh
💡
महत्वाची सूचना: जर आपल्याला ऑनलाईन ७/१२ मध्ये दाखवलेली माहिती आणि हस्तलिखित ७/१२ मधील माहितीमध्ये, जसे की ७/१२ चे एकूण क्षेत्रफळ, क्षेत्राचे मोजमाप, खातेदाराचे नाव किंवा खातेदाराचा भाग यामध्ये तफावत किंवा चूक आढळली, तर अशा दुरुस्तीसाठी आपण तलाठी यांच्याकडे ई-हक्क प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी कृपया https://pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन Mutation ७/१२ या पर्यायामध्ये दिलेल्या मार्गदर्शनानुसार आपले नोंदणी (Registration) व लॉगिन (Login) प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर हस्तलिखित ७/१२ च्या जुन्या प्रतीसह आपला ऑनलाईन अर्ज अपलोड करा.

Mahabhunakasha (महाभूनकाशा) – महाराष्ट्र भूमी नकाशा ऑनलाइन

महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाने महाभूनकाशा पोर्टलच्या माध्यमातून जमिनीचे नकाशे ऑनलाइन उपलब्ध केले आहेत. या पोर्टलवरून तुम्ही तुमच्या जमिनीचा नकाशा पाहू शकता.

  • mahabhunakasha.mahabhumi.gov.in या पोर्टलवर जा.
  • तुमच्या जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी संबंधित जिल्हा, तालुका, आणि गाव निवडा.
mahabhunakasha
  • नकाशावर तुम्हाला तुमचा प्लॉट निवडावा लागेल किंवा शोध पर्याय वापरून शोधा.
  • नकाशा तपासण्यासाठी ‘Map Report’ बटणावर क्लिक करा.
Map Report
  • ‘Single Plot’ किंवा ‘Single Plots of Same Owner’ या पर्यायांमधून एक निवडा आणि ‘Show Report PDF’ बटणावर क्लिक करा.
  • शेवटी, तुमच्या स्क्रीनवर नकाशा येईल, ज्याला तुम्ही डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता.
Plot Report

डिजिटल सातबारा (Digital Satbara)

महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाने डिजिटल स्वाक्षरी असलेले 7/12, 8A, मालमत्ता पत्रक आणि फेरफार नोंदी ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत.

  • digitalsatbara.mahabhumi.gov.in या पोर्टलवर जा.
  • नवीन युजर असल्यास ‘New User Registration’ लिंकवर क्लिक करून रेजिस्ट्रेशन करा किंवा लॉगिन करा.
digitalsatbara
  • दस्तावेज काढण्यासाठी वॉलेट रिचार्ज करावे लागेल. ‘Recharge Account’ टॅबवर जा आणि संबंधित रक्कम भरा.
Recharge Account
  • तुम्हाला हवे असलेले दस्तावेज निवडा. आम्ही इथे ‘डिजिटल 7/12’ निवडत आहोत.
  • जिल्हा, तालुका, गाव निवडा आणि संबंधित सर्वे/गट क्रमांक भरा. नंतर आवश्यक डेटा डाउनलोड करा.
Digitally signed 712

डिजिटल स्वाक्षरी असलेले हे दस्तावेज तुम्ही शासकीय आणि कायदेशीर कामांसाठी वापरू शकता.

आपले अभिलेख – जुने जमिनीचे रेकॉर्डस् (Old Land Records)

आपले अभिलेख पोर्टलद्वारे महाराष्ट्रातील जुने 7/12 फेरफार उतारा आता ऑनलाइन उपलब्ध आहे.

  • aapleabhilekh.mahabhumi.gov.in या पोर्टलवर जा.
  • नवीन युजर असल्यास ‘New User Registration’ लिंकवर क्लिक करून नोंदणी करा.
aapleabhilekh
  • ज्या ठिकाणचा तुमचा प्लॉट आहे त्या नुसार Office, District, Taluka, Village, Document, आणि Gat क्रमांक, Hissa क्रमांक किंवा सर्वे क्रमांक भरून ‘शोधा’ बटणावर क्लिक करा.
Search
  • संबंधित दस्तावेजाची सूची दिसेल. तुमच्या दस्तावेजासमोरील ‘View’ लिंकवर क्लिक करा आणि शेवटी दस्तावेज डाउनलोड किंवा प्रिंट करा.

आपली चावडी – 7/12 फेरफार नोटीस आणि स्थिती

महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाने आपली चावडी पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलद्वारे तुम्ही 7/12 फेरफाराची नोटीस आणि स्थिती तपासू शकता.

  • आपली चावडी या वेबपेजवर - digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi जा.
  • सातबारा, मालमत्ता पत्रक किंवा मोजणी या पर्यायांपैकी एक निवडा.
  • संबंधित जिल्हा, तालुका, आणि गाव निवडून कॅप्चा कोड भरा.

संबंधित फेरफार नोटीसमध्ये विक्री/खरेदीदारांची नावे, जमिनीची माहिती, व्यवहाराची माहिती, आणि महत्त्वाच्या तारखा मिळतील.

महा भुलेख पोर्टल संपर्क माहिती

कुठल्याही शंका किंवा समस्या असल्यास खालील महा भुलेख संपर्क माहिती वापरा:

संपर्क माहिती तपशील
कार्यालय जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख कार्यालय
पत्ता तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, कौन्सिल हॉल समोर, पुणे
दूरध्वनी ०२०-२६०५०००६
ई-मेल dlrmah[dot]mah[at]nic[dot]in
💡
या संपर्क माहितीचा वापर करून महाराष्ट्रातील नागरिक त्यांचे शंका आणि समस्या सोडवू शकतात आणि महाभूलेख पोर्टलद्वारे सहजपणे आवश्यक सेवा प्राप्त करू शकतात.